काँग्रेससाठी आता ‘करो या मरो’ स्थिती!
काँग्रेस पक्ष आता पुन्हा नवजीवन मिळवण्याचा प्रयत्न एकाच मार्गाने करू शकतो. तो म्हणजे हांजी हांजी संस्कृती सोडणे, ‘राजघराणे’ कल्पनेला मूठमाती देणे, पक्षातील अंतर्गत लोकशाही पुनर्प्रस्थापित करणे आणि कसलाही किंतु न ठेवता महात्मा गांधी-पंडित नेहरू यांनी ज्या मूळ सर्वसमावेशकतेच्या तत्त्वांचा अंगीकार केला होता, त्याकडे परतणे. हे जर त्या पक्षाने केले नाही, तर तो इतिहासजमा झालेला दिसेल.......